देवणी प्रतिनिधी : रोहित डोंगरे
देवणी तालुक्यात महात्मा फुलेनगर येथे कीर्ती सामाजिक विकास संस्थेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कीर्ती सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष रेखा निळकंठ डोंगरे, यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेचे पुष्प व हार घालून अभिवादन करण्यात आले तसेच कीर्ती सामाजिक विकास संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
यावेळी निळकंठ हणमंत डोंगरे. RPi जेष्ठ कार्यकर्ता देवणी श्रीदेवी प्रशांत शिंदे , समाजसेविका अमर रावण सूर्यवंशी, भाप क्रांती पार्टी तालुका अध्यक्ष देवणी. प्रशांत दादाराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ता देवणी. रवि राम डोंगरे, पुष्पक गायकवाड, सुमित डोंगरे,पूजा रणदिवे, डिगू राजकुमार कांबळे, प्रतीक डोंगरे, इत्यादी उपस्थित होते .