जळकोट भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष व सुधाकर भालेराव यांचे अत्यंत विश्वासू महादेव मठदेवरू यांनी आज उदगीर विधानसभा प्रमुख राहुल केंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला.
काही दिवसापूर्वी उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यांच्या सोबत महादेव मठदेवरू यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी पक्षा मध्ये होणारी घुसमट एकमेकाविषयी असलेला अविश्वास व भविष्य दिसत नसल्यामुळे त्यांनी आज परत स्वगृही येण्याचा निर्णय घेतला व आज पक्ष प्रवेश केला..!
यावेळी जळकोटचे तालुका अध्यक्ष सत्यवान पांडे, प्रा. पंडित सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते सोमेश्वर सोप्पा, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव तेलंग, मा शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, अजीत राठौड़ माजी जिल्हा परिषद सदस्य उस्मान मोमीन, माजी तालुका अध्यक्ष बालाजी केंद्रे, माजी तालुका अध्यक्ष अरविंद पाटील, अविनाश नळंदवार, रमेश चोले, बाबुराव गुट्टे, विश्वनाथ चाटे, सुनील थोंटे, भाऊराव कांबळे दामोधर केंद्रे उपस्थित होते